सिंधुदुर्गनगरी :
सावंतवाडी तालुक्यातील मौजे कुंभार्ली- रस्तावाडी येथील घर क्र. 1233 चा 20 मीटर परिसर दिनांक 12 ऑक्टोबर 2020पर्यंत, मौजे कुंभार्ली- रस्तावाडी येथील घर क्र. 1324 चा 20 मीटर परिसर दिनांक 13 ऑक्टोबर 2020पर्यंत, मौजे बांदा- निमजगा येथील घर क्र. 1981 चा 05 मीटर परिसर दिनांक 14 ऑक्टोबर 2020 पर्यंत, मौजे बांदा- हॉस्पिटलकट्टा येथील घर क्र. 1448 चा 05 मीटर परिसर, मौजे कोलगाव-चाफेअळी येथील घर क्र. 964 अ च्या 50 मीटर परिसर, दिनांक 15 ऑक्टोबर 2020पर्यंत, सावंतवाडी शहर खासकीलवाडा येथील गोठण रोड, घर क्र. ई511 पुरता पूर्व बाजूस-4 मीटर, पश्चिम बाजूस 5 मीटर, उत्तर बाजूस 3 मीटर, दक्षिण बाजूस 10 मीटर असा सुमारे 140 मीटर चा परिसर दिनांक 18 ऑक्टोबर 2020 पर्यत, मौजे बांदा- निमजगा येथील घर क्र. 929 चा 05 मीटर परिसर दिनांक 18 ऑक्टोबर 2020 पर्यंत, मौजे आजगांव- पांढरेवाडी येथील घर क्र. 660 चा 15 मीटर परिसर दिनांक 19 ऑक्टोबर 2020 पर्यंत, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोन संबंधित दिनांकापर्यंत रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.