सावंतवाडी
शहीद जवान, माजी सैनिक सेवेत असलेले सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अमृत जवान सन्मान अभियान या शासनाच्या उपक्रमात इंडियन एक्स- सर्व्हिसेस लीग सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे प्रतिनिधी म्हणून अभियानामध्ये दीपक शांताराम राऊळ यांची जिल्हा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या अभियानाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून त्यांनी नुकतेच इंडियन एक्स सर्व्हिस लीगच्या सिंधुदुर्ग शाखेला पत्र पाठवून श्री राऊळ यांची नियुक्ती झाल्याचे कळविले आहे.
सैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय यांच्याकरिता शासनाने अमृत जवान सन्मान अभियान ची स्थापना केली आहे, या अभियानामध्ये प्रत्येक जिल्हा व तालुका पातळीवर कमिट्या स्थापन करून प्रत्येक कमिटीवर माजी सैनिक संघटनेचा एक प्रतिनिधी घ्यावा असे शासनाचे जिल्हाधिकारी यांना आदेश आहेत, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व सर्व तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी यांना या शासन आदेशाप्रमाणे अभियानामध्ये माजी सैनिकांना प्रतिनिधी म्हणून सामावून घेण्याबाबत इंडियन एक्स सर्व्हिसेस लीग सिंधुदुर्ग शाखेने कळविले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा केंद्राचे प्रतिनिधी म्हणून दीपक शांताराम राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सावंतवाडी येथे झालेल्या माजी सैनिकांच्या इंडियन एक्स सर्व्हिसेसच्या जिल्हा शाखेच्या सभेमध्ये संघटनेचे माजी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पी.एफ. डान्टस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन शिवराम जोशी, व्हाईस चेअरमन श्री. हिंदबाळ केळुसकर, संचालक सुभाष सावंत, बाबुराव कविटकर, दिनानाथ सावंत, शिवाजी परब, राजाराम वळजू, शशिकला गावडे, बाळकृष्ण गावडे, दीपक शेटये, कृष्णा परब, विक्टर पिंटो, भिवा गावडे, चंद्रशेखर जोशी, शशिकांत मोरजकर, भास्कर कोचरेकर लक्ष्मण राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.