*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी गझलाकार अरविंदजी ढवळीकर यांची अप्रतिम काव्यरचना*
*गंध पावसाचा*
( माझी एक आवडती कविता)
सांग पावसाच्या थेंबा गंध तुझा की मातीचा
यात चाहूल उद्याची कां हा आठव स्मृतींचा
जन्म जन्माचं गुपीत गेली पहाट सांगून
भर दुपारी उन्हांत
गेले तारुण्य जळून
सांज तुझ्या सवे देई का रे सांगावा प्रितिचा?
सुख वार्या संगे गेले
दु: ख फुलांनी टिपले
माझ्या ऒंजळीत आतां
मोत्या विनाच शिंपले
इथे न्याय ज्याचा त्याचा रे वेगळ्या नितिचा
देशी मातीत सांडून
क्षणी आकाश खुणांना
गंध जिवनाचा येई
इथे संपल्या क्षणांना
तुला सांगेल कां कोणी अर्थ तुझ्या या भॆटिचा?
सांग पावसाच्या थेंबा गंध तुझा की मातीचा?
अरविंद