You are currently viewing सिंधुदुर्गातील दिव्यांग बांधवांना आता मिळणार रोजगाराची संधी…

सिंधुदुर्गातील दिव्यांग बांधवांना आता मिळणार रोजगाराची संधी…

साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचा पुढाकार; लाभ घेण्याचे आवाहन…

ओरोस

सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था-कसाल यांच्या वतीने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना रोजगार निर्मिती करून देणारा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याच माध्यमातून बेरोजगार दिव्यांगांना प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. तरी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत प्रसिद्धी पत्रक देण्यात आले.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, जे दिव्यांग बांधव बेरोजगार आहेत. व त्यांना काम करायची ईच्छा आहे, अशा सर्व दिव्यांग बांधवांना रोजगार प्रशिक्षण देवुन त्यांना रोजगार उपलब्ध करून देनार आहे. तसेच सर्वांची राहण्याची व जेवणाची व्यवस्थाही केली जाईल, तरी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी त्वरीत संस्थेशी 9765979450 / 9623655142 या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा