You are currently viewing भोगलेवाडीतील स्वामी विश्व संकुल स्टॉपच्या नामफलकाचे अनावरण सरपंच मानसी पालव यांच्या हस्ते

भोगलेवाडीतील स्वामी विश्व संकुल स्टॉपच्या नामफलकाचे अनावरण सरपंच मानसी पालव यांच्या हस्ते

मालवण (मसुरे) :

मालवण तालुक्यातील बागायत भोगलेवाडी मालवण रस्त्यावरती भोगलेववाडी चढण या ठिकाणी येथील सामाजिक कार्यकर्ते अँडो. श्री सुरेश बोभाटे यांच्या प्रयत्नाने येथील ग्रामस्थांची गरज ओळखून स्वामी विश्व संकुल स्टॉप येथे बस थांब्याच्या नाम फलकाचे अनावरण बिळवस सरपंच सौ मानसी पालव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 

या प्रसंगी अँडो. श्री सुरेश बोभाटे, लक्ष्मण पालव,अरविंद गांवकर, कमलाकर घाडीगावकर व संकुलातील इतर सभासद हजर होते. या परिसरातील ग्रामस्थांना स्वामी विश्व संकुल येथे एस टी थांब्याची जरुरी होती त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते अँडो. श्री सुरेश बोभाटे यांच्या विशेष प्रयत्नाने सर्व संबंधित अधिकारी वर्गाशी विचारविनिमय करून या ठिकाणी एसटी थांबा मंजूर करून घेतला व या एसटी थाब्याच्या नाम फलकाचे अनावरणही नुकतेच करण्यात आले.

 

ग्रामस्थांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. सुरेश बोभाटे यांच्या या सामाजिक कार्याचे बिळवस सरपंच सौ. मानसी पालव यांनी विशेष कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − 7 =