सावंतवाडी :
समाजमाध्यम, बदलती सामाजिक परिस्थिती आणि त्यामुळे बिघडलेल सामाजिक स्वास्थ्य यामुळे आजच्या तरुण पिढीसमोर अनेक आवाहने उभी आहेत. अशावेळी लहानपणापासूनच आपल्या मुलांवर चांगले संस्कार करण्याची गरज ओळखून अटल प्रतिष्ठानचे सातत्याने गेली सोळा वर्षे विद्याभारतीच्या अभ्यासक्रमावर आधारित संस्कारक्षम शिशु शिक्षण देण्याचे हे समाजाभिमुख कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्ह्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री दयानंद चौधरी यांनी केले.
त्यांच्या स्व. मातोश्रींची आज पुण्यतिथी त्याचे औचित्य साधून त्यानी अटल प्रतिष्ठान संचलित वसंत शिशुवाटिका व स्व. विद्याधर भागवत शिशुवाटिकेसाठी खेळणी प्रदान केली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माध्यमिक व उच्चमाध्यमिक परिक्षेत यश प्राप्त केलेल्या मुलांचा सत्कार करण्यात आला. अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर यांनी या जिल्ह्यात गेली वीस वर्षे मनोरमा ट्रस्टच्या माध्यमातून श्री चौधरी हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्य क्षेञात भरीव कार्य करत असून त्यांच्यावर स्व. हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा प्रभाव आहे.
ते या जिल्ह्यातील जेष्ठ शिवसैनिक असून राजकारणापेक्षा समाजकारणातच ते जास्त सक्रिय आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन केले.
आभार प्रदर्शन अटल प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. राजशेखर कार्लेकर यांनी केले. यावेळी मनोरमा ट्रस्टचे सचिव श्री संदिप साळसकर, पदाधिकारी श्री अशोक दळवी, जया शेट्टी, श्री दत्ता शिर्के, शिशुवाटिका विभागाच्या व्यवस्थापिका डॉ. सौ. रश्मी कार्लेकर, प्रधानाचार्या श्रीमती विजया रामाणे, आचार्या सौ. रसिका भराडी, सौ. सत्यभामा परब, सौ. सायली सरमळकर, सौ. धनश्री देऊसकर, चाईल्ड लाईनच्या कु. पुनम पार्सेकर, श्री विश्वनाथ सनाम, श्रीमती प्रज्ञा तांबे, श्रीमती मानसी मोरजकर, अटल चे पदाधिकारी व पालक उपस्थित होते.