You are currently viewing अमित ठाकरे यांनी दिली शहर कार्यालयाला भेट

अमित ठाकरे यांनी दिली शहर कार्यालयाला भेट

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केले स्वागत

सावंतवाडी

मनसे नेते आणि म.न.वि.से अध्यक्ष श्री. अमित राज ठाकरे यांचा म.न.वि.से पुनर्बांधणी महासंपर्क अभियान दौऱ्याची सुरुवात आज सावंतवाडीतून झाली. श्री अमित ठाकरे यांनी मनसे शहर मध्यवर्ती कार्यालय सावंतवाडी येथे सदिच्छा भेट दिली.यावेळी मनसे शहरअध्यक्ष आशिष सुभेदार आणि मनसे पदाधिकारी यांनी जोरदार स्वागत केले. शहराध्यक्ष सुभेदार यांच्या हस्ते अमित ठाकरे यांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन शहर मध्यवर्ती कार्यालयात स्वागत करण्यात आले. विविध विषयांवर श्री ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी मनसे सरचिटणीस मा आमदार परशुराम उपरकर,  मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर,  संपर्कअध्यक्ष अमोल साळुंखे कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे, राजेश टंगसाळी उपशहर अध्यक्ष शुभम सावंत प्रकाश साटेलकर राजेश मामलेकर सुरेंद्र कोठावळे निलेश मुळीक स्नेहा मुळीक संदेश शेटये आबा चिपकर भास्कर सावंत मंदार सुभेदार अभय देसाई बाबु राऊळ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा