You are currently viewing वैभववाडीत अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात आज दुपारी आढावा बैठक

वैभववाडीत अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात आज दुपारी आढावा बैठक

आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

वैभववाडी

मागील चोवीस तासांत वैभववाडी तालुक्यात २३० मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत येथील तहसील कार्यालयात आज दुपारी २ वाजता आढावा बैठक संपन्न होणार आहे. या आढावा बैठकीला राष्ट्रीय प्राधिकरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, वीज वितरण विभाग व इतर खाते प्रमुखांनी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार रामदास झळके यांनी केले आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका वैभववाडी तालुक्याला बसला आहे. करूळ व भुईबावाडा घाटात दरडी कोसळण्याचे सत्र सुरू आहे. तर काही ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्या आहेत. त्याचबरोबर पूरस्थिती उद्भवल्यामुळे अनेक काॅजवे पाण्याखाली जाऊन काही गावांचा संपर्क तुटला होता. या परिस्थितीचा या बैठकीत आढावा घेऊन त्याबाबत खबरदारीच्या दृष्टीने अधिका-यांना सुचना करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा