दिल्ली :
बिहारच्या राजकारणातील वजनदार नेते आणि लोक जनशक्ती पार्टीचे माजी अध्यक्ष राम विलास पासवान यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. राम विलास पासवान यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
मला आज प्रचंड दु:ख झाले आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. आपल्या देशात आज पोकळी निर्माण झाली आहे. कदाचित ती कधी भरुन निघणार नाही. राम विलास पासवान यांचे निधन हे माझे वयैक्तीक नुकसान आहे. मी माझा मित्र, मौल्यवान सहकारी गमावला. प्रत्येक गरीब माणसाला सन्मानाने जगता आले पाहिजे, ही कळकळ त्यांच्या ठायी होती असे पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दिल्लीतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. रामविलास पासवान हे लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री होते. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून रामविलास पासवान हे आजारी होते.
दिल्लीतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी ट्वीट करुन निधन झाल्याची माहिती दिली आहे.
रामविलास पासवान यांच्यावर काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील रुग्णालयात हार्ट सर्जरी करण्यात आली होती. रामविलास पासवान यांनी २००० साली लोकजनशक्ती पक्षाची स्थापना केली होती.