You are currently viewing छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ हाच आमचा धर्मग्रंथ – प्राचार्य राजेंद्रकुमार चौगुले

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ हाच आमचा धर्मग्रंथ – प्राचार्य राजेंद्रकुमार चौगुले

कणकवली

छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे बहुजन समाजाचे महानायक , शेतकऱ्यांचे उद्धारकर्ते, विशाल मनाचे राजे व एक लोकनेते होते.त्यांनी तळागाळातील बहुजन वर्गास समाजातील मुख्य प्रवाहात आणले. त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत.समाजात समानता प्रस्थापित करायची असेल तर आधी जातीभेदाचे निर्मुलन होणे गरजेचे आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ हाच आमच्यासाठी धर्मग्रंथ आहे.असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी केले.

कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे कणकवली काँलेज कणकवली येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज तथा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले बोलत होते.प्रारंभी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सांस्कृतिक विभाग प्रमुख युवराज महालिंगे,पर्यवेक्षक मंगलदास कांबळे, प्रा.डॉ. मारोती चव्हाण , डॉ. विद्याधर तायशेट्ये,पोलीस निरीक्षक हुलावलेकर,महेश सरनाईक ,स्मिता नलावडे, अर्पिता मुंबरकर,संतोष जाधव,हर्षदा वाळके उपस्थित होते.

प्रा.डॉ. मारोती चव्हाण यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या इतिहासातील कामगिरीवर प्रकाश टाकून.’जसा राजा तशी प्रजा’ या उक्तीचे मूर्तीमंत उदाहरण छत्रपती शाहू महाराजांचे कार्य होते असे मत व्यक्त केले.प्रा.मंगलदास कांबळे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार अंगिकारले पाहिजेत असे मत व्यक्त केले.सामाजिक कार्यकर्ते अर्पिता मुंबरकर यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त साधून व्यसनमुक्ती जनजागृती वर विचार व्यक्त केले.सम्रग शिक्षा जिल्हा सिंधुदुर्ग कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे यांनी ही छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याचा आलेख विशद केला.डॉ. विद्याधर तायशेट्ये व पत्रकार महेश सरनाईक यांनी ही छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे विचार अंगिकारण्याची आज नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई ,रोटरी क्लब कणकवली सेंट्रल आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती साठी जनजागृती केली, त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.तसेच अमंली पदार्थ सेवन विरोधी, व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.युवराज महालिंगे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.सीमा हडकर तर आभार प्रा.हरीभाऊ भिसे यांनी मानले. या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.सुरेश पाटील, छात्रसेना विभाग प्रमुख प्रा.डॉ. बाळू राठोड व महाविद्यालयातील प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × four =