You are currently viewing अमेरिकेच्या नासा संशोधन केंद्रातर्फे मंगळ ग्रहावरील मार्स मिशन 2026 करिता डॉक्टर नीलंबरी गानू यांची निवड

अमेरिकेच्या नासा संशोधन केंद्रातर्फे मंगळ ग्रहावरील मार्स मिशन 2026 करिता डॉक्टर नीलंबरी गानू यांची निवड

जुलै 2026 मध्ये होणार मंगळ ग्रहावर मार्स मिशन

महाराष्ट्रातील राजगुरुनगर, पुणे येथे राहणाऱ्या प्रसिद्ध लेखिका कवयित्री डॉ.निलांबरी गानू यांची अमेरिकेच्या नासा संशोधन केंद्रातर्फे मंगळ ग्रहावर होणाऱ्या मार्स मिशन 2026 करिता निवड झाली आहे. अमेरिकेच्या नासा तर्फे जुलै 2026 मध्ये मंगळ ग्रहावर मार्स मिशन 2026 ला पाठविण्यात येणार आहे. जगभरातील निवडक मान्यवर व्यक्तींची मार्स मिशन 2026 साठी निवड केली जाते. मार्स मिशन 2026 च्या यादीत डॉ.निलांबरी गानू यांचे नाव सामील केले आहे. त्याचबरोबर नासाकडून त्यांना मार्स मिशन 2026 साठी बोर्डिंग पास देखील वितरित करण्यात आला आहे.
डॉक्टर निलांबरी गानू यांचे शिक्षण बीकॉम पर्यंत झाले असून त्यांनी आतापर्यंत शेकडो मराठी कविता 500 पेक्षा जास्त हिंदी कविता जवळपास 300 पेक्षा जास्त गुजराती कविता लिहिलेल्या आहेत डॉ.नीलांबरी गानू यांनी संत गाडगेबाबांच्या जीवनावर देखील कादंबरी लिहिलेली असून अहिल्याबाई होळकर यांच्यावर तब्बल चार कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, बंदिस्त ही सामजिक कादंबरी लिहिली आहे. शेकडो कविता, संशोनात्मक लेखन केलेले आहे. अलौकिक अशी साहित्य संपदा जवळ असणाऱ्या आणि साहित्यासाठी स्वतःला वाहून घेतलेल्या डॉ.नीलांबरी गानू या प्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर यांच्या भाची आहेत. डॉ.निलांबरी गानू यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील तीन देशांनी डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली आहे. अमेरिकेतील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी अँड लीडर्स ऑटोनोमी इंटरनॅशनल यांनी फिलॉसॉफी इन ग्लोबल डेव्हलपमेंट मध्ये डॉक्टरेट प्रदान केली. नायजेरिया येथील डायनामिक पीस रेस्क्यू मिशन इंटरनॅशनलने हॉनररी डॉक्टरेट पदवी दिली आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ ह्यूमन एक्सिलेन्सने हुमेनिस्टिक सायन्स मध्ये त्यांना डॉक्टरेट दिलेली आहे. डॉ.सौ.नीलंबरी गानू यांच्या नावे पोस्ट तिकीट देखील निघालेले आहे.
अमेरिकेच्या नासा संशोधन केंद्रातर्फे मंगळ ग्रहावरील मार्स मिशन 2026 साठी डॉ.निलांबरी गानू यांच्यासारख्या प्रतिभा संपन्न लेखिकेची निवड करून त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा यथोचित सन्मान केलेला आहे. डॉ.निलांबरी गानू या साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच नाशिकच्या समन्वयक आहेत. त्यांच्या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी, साहित्य क्षेत्रातील साहित्यिकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =