वैभव रावराणे यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी मंगेश लोके; प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली माहिती

वैभववाडी

शिवसेना युवा सेना शहर प्रमुख वैभव रावराणे यांनी शिवसेनेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खोटे सांगून व्हॉट्सअप व फोनव्दारे हजारो रुपयांची मागणी करुन पदाधिकारी व कार्यकर्त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी वरिष्ठांच्या आदेशानुसार वैभव रावराणे यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी केली असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे सांगितले आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, वैभव रावराणे यांना गेल्या दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्षामध्ये पक्षाच्या ध्येय धोरणांनुसार सामाजिक बांधिलकी जपून काम करण्यासाठी प्रवेश देण्यात आला होता. परंतु, पूर्वी ज्या पक्षामध्ये आपण काम करत असताना आपल्या काही आर्थिक फसवणूकीच्या विषयांमुळे आपल्याला तेथूनही दूर करण्यात आले होते. परंतु शिवसेना पक्षात आल्यावर आपण काही तरी जुने सर्व विसरून नव्याने चांगले काम कराल व माझ्याकडून अशा आर्थिक फसवणूकीचा विषय यापुढे कुणाच्याही बाबतीत घडणार नाही असे सांगितले होते.
शिवसेना पक्षात आपण प्रवेश केल्यानंतर लगेचच सहा महिन्यामध्ये आपण आपले पूर्वीचेच प्रताप सुरू केलेत. अनेक शिवसेनेच्या काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांना खोटे सांगून व्हॉट्सअप व फोनव्दारे आपण अनेकांकडे आर्थिक विषयांची मागणी केली. यामध्ये अनेकांनी आपल्याला हजारों रुपये दिलेत. आपण काहींना लगेच पैसे देतो म्हणून सांगितले परंतु पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजारोवेळा फोन करुन सुध्दा आपण त्यांची घेतलेली रक्कम परत केलेली नाही. याबाबत अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची माझ्याकडे लेखी स्वरूपात तक्रारी आल्या आहेत. शिवसेना पक्षामध्ये ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशा प्रकारचे काम केले जाते.
तरी आपल्या सर्व तक्रारी वरिष्ठ पातळीवर गेल्या असून त्याची दखल घेऊन वरिष्ठांनी शिवसेना प्रमुख म्हणून मला आपली शिवसेना पक्षातून हकालपट्टी करायला सांगितले आहे. त्यामुळे यापुढे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी आपला कोणताही संबंध राहणार नसल्याचे वैभववाडी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा