You are currently viewing सहकार क्षेत्रातील युवा नेतृत्व

सहकार क्षेत्रातील युवा नेतृत्व

प्रफुल्ल सुद्रिक वाढदिवस अभिष्टचिंतन

कणकवली तालुक्यातील कळसुली गावचे तरुण तडफदार व सहकार क्षेत्रातील युवा नेतृत्व म्हणून ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते म्हणजे युवा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल सुरेश सुद्रिक…!

आपले वडील कै.सुरेश सुद्रिक यांच्याकडून समाजकारण व राजकारणाचा घेतलेला वसा कायम ठेवत प्रफुल्ल सुरेश सुद्रिक यांनी आपली दैदिप्यमान वाटचाल सुरू ठेवली आहे. वडील कै. सुरेश सुद्रिक यांचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी अतिशय घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे अजितदादा पवार यांच्याशी असलेले नाते जोपासून प्रफुल्ल सुद्रिक यांनी अजितदादांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजकारण व राजकारणात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे.
प्रफुल्ल सुद्रिक यांनी आपल्या राजकीय वाटचालीत सन 2007 मध्ये कुडाळ तालुका युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला, तेव्हापासून कधी त्यांनी मागे वळून पाहिले नाही. अनेक वर्ष त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा होते. 2013 मध्ये त्यांच्याकडे युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद होते, त्यानंतर पुन्हा एकदा गेल्या काहीच महिन्यांपूर्वी प्रफुल्ल सुद्रिक यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले आहे. प्रफुल्ल सुद्रिक यांनी आपल्याला मिळालेल्या पदाचा योग्य उपयोग करून संधीचे सोने केले आहे. कृषी क्षेत्रातील आयडॉल म्हणून प्रफुल्ल सुद्रिक यांच्याकडे पाहिले जाते. वडील कै.सुरेश सुद्रिक यांच्याप्रमाणे राजकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील वाटचाल सुरू ठेवून वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवल्याचे दिसून येते. प्रफुल्ल यांचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी कमी वयात ते जिल्हा नियोजनचे सदस्य देखील आहेत.

जयाच्या अंगी सद्गुण भांडार
तयास लागे ना कुणाचा आधार
या उक्तीप्रमाणे त्यांच्या अंगी असणाऱ्या सदगुणांमुळेच ते युवकांचे प्रेरणास्थान बनले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक संघटना अधिक बळकट करणे व युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी करिअर मार्गदर्शन आधी वर्गांच्या माध्यमातून प्रयत्नशील असणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. राष्ट्रवादी संघटना वाढविण्याबरोबरच विविध उपक्रम राबविण्यावर त्यांचा भर असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भविष्यात जिल्हा परिषद सदस्य म्हणून जाण्याची त्यांची इच्छा असून कुडाळ तालुक्यातील आंबड व कणकवली तालुक्यातील कळसुली आधी विभागावर त्यांनी विशेष लक्ष देऊन काम सुरू केले आहे. प्रफुल्ल यांचे वडील कैलासवासी सुरेश सुद्रिक यांना जिल्हास्तरावर विशेष मान होता आपल्या वडिलांचे स्मृति जागृत ठेवण्यासाठी प्रफुल्ल सुद्रिक यांनी 2009 मध्ये वडील सुरेश सुद्रिक यांच्या नावाने ट्रस्ट स्थापन करून ट्रस्टच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत करण्याचे कार्य त्यांनी सुरू केले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे सहकार महर्षी कैलासवासी शिवराम भाऊ जाधव यांच्या कार्याने प्रेरित होऊन प्रफुल्ल सुद्रिक यांनी सहकार क्षेत्रामध्ये पाय रोवले आहेत. राजकीय क्षेत्राबरोबरच सहकार क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.

राजकारण समाजकारण करत असताना व्यवसाय म्हणून प्रफुल्ल यांनी बांधकाम क्षेत्राकडेही आपला मोर्चा वळवला आहे बांधकाम क्षेत्रात नाव कमावताना त्यांनी जवळपास 30 ते 40 बंगलो आणि इमारती बांधल्या आहेत. एवढ्यावरच न थांबता प्रफुल्ल सुद्रिक यांनी कळसुली गावातील आपल्या 20 एकर क्षेत्रात बागायती केलेली असून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंबे काजू नारळ पोपळी कोकम अशी कोकणात भरघोस उत्पन्न देणारी झाडे लावली असून या बागायती मधून उत्पन्न मिळवताना त्यांनी गावातील दहा ते पंधरा युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्याचबरोबर दुग्धविकास करण्याच्या उद्देशाने आपल्या फॉर्ममध्ये गाई म्हशी देखील पाळल्या आहेत.

मनगटात असता ताकद
जिद्दीने मिळते यशाची वाट
कष्ट न करता कसा मिरवायचा
उगा नसलेल्या गोष्टींचा थाट?

आजकालची नवी पिढी चार पैसे खिशात आले की अगदी घोड्यावर स्वार झाल्यासारखे गाड्या घेऊन सुसाट पळतात. अशा युवकांसाठी प्रफुल्ल सुरेश सुद्रिक हे उत्तम उदाहरण ठरले आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रात नाव कमावल्यानंतरही त्यांनी बांधकाम व्यवसायात पाऊल ठेवून यशस्वी उद्योजक म्हणून जिल्ह्यात नाव कमावले आहे. बांधकाम क्षेत्रात काम करत असताना अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बारमाही पाणी असल्याने सुजलाम सुफलाम जिल्हा बनला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेती बागायती मोठ्या प्रमाणावर केली जाते व त्यातून चांगले उत्पन्नही मिळते. या सर्व बाबींचा विचार करून राजकारण समाजकारण आणि बांधकाम व्यवसाय इत्यादी सर्व सुरू असताना कृषी क्षेत्रातही प्रफुल्ल सुद्रिक मागे राहिले नसून कृषी क्रांती घडविण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर बागायती शेती केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रोजगार नाहीत, नोकऱ्या नाहीत अशा प्रकारे व्यक्त होणाऱ्या लोकांसाठी प्रफुल्ल सुद्रिक हे एक युवा रोल मॉडेल म्हणून पुढे आलेले आहेत.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा