सावंतवाडी
बुद्धीबळ हा भारतीय खेळ आहे. या खेळाबरोबर मुलांनी अभ्यासालाही महत्त्व दिले पाहिजे. मुलांची आता विचार करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता कमी झाली आहे. आणि ती क्षमता वाढविण्याचे काम बुद्धीबळ या खेळातून होते, त्यामुळे या खेळाला शालेय जीवनात फार महत्त्व आहे. असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कौस्तुभ पेडणेकर यांनी मळगाव येथे केले.कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगाव आणि मुक्ताई अकॅडमी सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत एकदिवसीय बुध्दिबळ प्रशिक्षण शिवीर मळगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी-विद्यार्थीनिसाठी मळगाव वाचन मंदिरात आयोजित करण्यात आले होते.यावेळी पेडणेकर बोलत होते.
व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, वाचन मंदिरचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, उपाध्यक्ष बावली नार्वेकर, पृथ्वीराज बांदेकर आदी उपस्थित होते.
सडेकर म्हणाले,, बुद्धीबरोबर मुलांची शारीरिक क्षमताहि वाढली पाहिजे, त्यासाठी मुलांनी आता पासून नेहमी योग प्राणायाम केला पाहिजे. तुमचे सुदृढ शरीर तुमचे चांगले भविष्य घडविते. त्यामुळे मुलांनी योग प्राणायाम करणे गरजेचे आहे. असे मौलिक विचार मांडले. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे वाचन मंदिरचे अध्यक्ष हेमंत खानोलकर यांच्या हस्ते भेटकार्ड देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी. दत्ताराम जी. सडेकर पुरस्कृत शालेय विद्यार्थी निबंध लेखन स्पर्धा २०२२ चे विजेते स्पर्धक यांचे वाचन मंदिरच्यावतीने ग्रथ, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक बाबली नार्वेकर, सूत्रसंचालन पृथ्वीराज बांदेकर तर आभार हेमंत खानोलकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. बुद्धीबळ प्रशिक्षणाला पंचक्रोशीतील वाचक सभासद ग्रंथप्रेमी, विद्यार्थी, पालक, मुक्ताई अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते