सिंधुदुर्ग
आज संपूर्ण जगात कोरोना महामारीमुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत याची जाणीव आम्हाला आहे. कोविड १ ९ या महामारीचा सामना करण्यासाठी आपण घालून दिलेले नियम व अटी यांचे पालन करण्यासाठी सर्व प्राथमिक शिक्षक लोकांमध्ये जनजागृतीचे काम प्रामाणिकपणे करत आहेत. कोरोना १ ९ च्या वाढत्या प्रादुर्भावमुळे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परजिल्हयातील नागरिकांच्या कक्ष व्यवस्थापन ड्युटी गेले पाच ते सहा महीने प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे बजावत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेले परजिल्हयातील शिक्षक चतुर्थी, दिवाळी व मे महिन्यात आपल्या मूळ गावी जात असतात. आज अनेक शिक्षकांना आपल्या कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते. काही शिक्षकांचे घरी वृद्ध आई – वडील , भाऊ, बहीण, पत्नी व मुले त्यांच्या घरीच असतात. त्यांना भेटण्यासाठी त्यांचा जीव व्याकूळ झालेला आहे. तसेच गेली वर्षभर आपल्या कुटुंबापासून दूर आहेत. दिवाळी नंतर शाळा सुरू होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या मूळ गावी जाणे त्यांना अशक्य आहे. त्यामुळे त्यांना दिवाळी सुट्टीच्या काळात स्वग्राम जाण्यासाठी व मुख्यालय सोडण्यासाठी विनाअट परवानगी मिळावी अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग च्या वतीने मा.मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कडे केली आहे. .