You are currently viewing भाकरीचं झाड

भाकरीचं झाड

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी मनीष अहिरे यांची अप्रतिम काव्यरचना

माझ्या बापाच्या शेतात l
झाडं भाकरीच आलं ll
पिकं मातीवरीं उभं l
कस वाऱ्याने डोललं *llधृll*
चाले तिफनीचा फाळ l
करा पेरणी पेरणी ll
बीज दडे भुईआड l
त्याची निराळी कहाणी *ll1ll*
बाप राबतो राबतो l
औत धरीतो शेतात ll
त्याच्या घामावं तरल l
पिकं हिरवं रानात *ll2ll*
बाप माझा अणवाणी l
करी रक्ताचं पाणी ll
सारं शिवार हिरवं l
झाली झाली आबादाणी *ll3ll*
रात रात जागुनीया l
पाणी भरीतो शेताले ll
लेकरांवाणी जपतो l
बाप माझा पिकांले *ll4ll*
उन्हतान्ह बारा मास l
राबतोय रातंदिस ll
अवकाळी, दुष्काळी l
झेले संकटांचे फास *ll5ll*
तुरे बहरता शेतं l
धरी गोफनीचा गोट ll
माझ्या बापाच्या हातात l
साऱ्या दुनियेचं पोट *ll6ll*
चार घास आनंदाचे l
शेतकऱ्या उपकार ll
धन्य धन्य बाबा तु रं l
तुझं भाकरीचं झाडं *ll7ll*

*कवी:मनिष आहिरे*
*(नाशिक)*
7588069679

प्रतिक्रिया व्यक्त करा