कुणकेरी येथील शासकीय वनक्षेत्रात वृक्ष लागवड; खत बनवण्याचेही घेतले प्रशिक्षण…
सावंतवाडी
येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या चिमुकल्यांनी कुणकेरी येथील शासकीय वनक्षेत्रात वृक्षारोपण मोहीम राबवत समाजाला अनोखा संदेश दिला. यावेळी आंबा, पेरू, जाम, काजू, जांभूळ अशा विविध फळ झाडांची लागवड करण्यात आली. प्रशालेचे प्रमुख रुजूल पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.
कृषी दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या उपक्रमात वृक्ष लागवडी बरोबरच विद्यार्थ्यांना खत बनविण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तर तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धना संदर्भात संदेश देणारी नाटिका सादर केली. तर वृक्ष लागवड मोहिमेत चौथी व पहिलीतील विद्यार्थी सहभागी झाले होते.