You are currently viewing वेंगुर्ला तालुका काँग्रेस तर्फे काँग्रेसचे जेष्ठ नेते स्व.अहमदजी पटेल यांना श्रद्धांजली अर्पण…

वेंगुर्ला तालुका काँग्रेस तर्फे काँग्रेसचे जेष्ठ नेते स्व.अहमदजी पटेल यांना श्रद्धांजली अर्पण…

वेंगुर्ला
काँग्रेसचे जेष्ठ नेते स्वर्गीय अहमदजी पटेल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी वेंगुर्ला तालुका काँग्रेस कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करताना जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख यांनी स्वर्गीय अहमदजी पटेल यांचे जीवनकार्य हे प्रेरणादाई असून प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला मार्गदर्शक ठरणारे आहे. त्यांचे विचार पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी नगरसेवक दादा सोकटे, नगरसेविका कृतिका कुबल, नगरसेविका स्नेहल खोबरेकर, मिठ्ठू मकानदार इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + one =