You are currently viewing कणकवली-कलमठ येथे ५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान…

कणकवली-कलमठ येथे ५४ रक्तदात्यांनी केले रक्तदान…

कणकवली

कै. दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली आयोजित रक्तदान शिबीर कलमठ ग्रामपंचायत हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन कलमठ सरपंच धनश्री मेस्त्री यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी व्यासपीठावर उपसरपंच वैदही गुडेकर, सामाजिक कार्यकर्ते रामदास विखाळे,उद्योजक शशिकांत रगजी,सामाजिक कार्यकर्ते विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री, धनंजय सावंत, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान कणकवली तालुकाध्यक्ष अभिषेक नाडकर्णी, डॉ सागर पटेल आदी उपस्थित होते.

रक्तमित्र अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिरास ६४ रक्तदात्यांनी हजेरी लावली. त्यापैकी ५४ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर १० रक्तदाते तांत्रिक कारणास्तव रक्तदान करू शकले नाहीत. यावेळी रक्तदात्यांना सुपारीची रोपे देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सल्लागार आणि पत्रकार राजन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी, कुडाळ कार्यकारणी सदस्य साईनाथ आंबरेकर, श्री केशव पावसकर, शामसुंदर आचरेकर, सचिन आचरेकर, रोट्रॅक्टचे मिहीर तांबे, अभिषेक साटविलकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी तुषार पावसकर, योगेश जाधव, अमोल भोगले, सुहासिनी कुलकर्णी-भट, केतन दळवी, सर्वेश राणे, माणिक वाघमारे, श्रद्धा पाटकर, योगेश चव्हाण आदींनी प्रयत्न केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा