You are currently viewing विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयात वाहन लोकार्पण सोहळा संपन्न

विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयात वाहन लोकार्पण सोहळा संपन्न

सावंतवाडी :

विलवडे येथील राजा शिवाजी विद्यालयात वाहन लोकार्पण सोहळा माजी विद्यार्थी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. विलवडे बरोबरच सरमळे नांगरतास, भालावत, कोनशी, तांबोळी या पंचक्रोशीतून दूरवरून येणारे विद्यार्थी आणि त्यांची येण्या जाण्यासाठी करावयाची लागणारी धडपड आणि गैरसोय लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं यासाठी या विद्यालयाचे माजी विद्यार्थी एकवटले आणि त्यांनी संघटनेच्या माध्यमातून नवीन चार चाकी वाहन खरेदी केले आणि शाळेला भेट दिली.

यात सर्वाधिक योगदान दिले ते जया दळवी, संदीप दळवी गिरीश दळवी यांनी, पांडुरंग शिवराम दळवी यांच्या स्मरणार्थ या वाहन खरेदीसाठी सर्वाधिक दोन लाखाचा निधी स्वतःत्यांनी आपल्या परिवाराकडून दिला. यावेळी अनेक आजी-माजी विद्यार्थी सह ग्रामस्थ, शिक्षक वृंद, पालकवर्ग सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी संस्थाध्यक्ष संभाजी दळवी हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. त्यांनी माजी विद्यार्थी संघटनेने आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करताना तुम्ही दिलेलं योगदान शाळा कधीच विसरणार नाही शाळा तुमची कायमची ऋणी राहील असंच शाळेवर नेहमी लक्ष रहावे तुमचे कार्य इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असेच असून केलेल काम कौतुकास्पद आहे त्यामुळे शाळेच्या वतीने संस्थेच्या वतीने त्यांनी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि आभार व्यक्त केले. संघटनेचे अध्यक्ष रोहिदास दळवी, सचिव रुपेश परब यांनीही आपल्या मनोगतात शाळेच्या आठवणींना उजाळा देताना शाळेसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करता आल याचे समाधान व्यक्त केले. तसेच अनेक माजी विद्यार्थी आहेत ज्यांची संघटना वाट पाहतेय आपण संघटनेत सामील व्हावं व शाळेच्या प्रगतीला हातभार लावावा अशाप्रकारचे आवाहन संघटनेच्या वतीने केले.

यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात शाळेच्या जडणघडणी विषयी विचार व्यक्त केले वीस पंचवीस वर्षांपूर्वीची शाळा आणि आजची शाळा यात खूप फरक आहे आणि हे सर्व घडते सर्व आजी माजी विद्यार्थ्यांच्या ,ग्रामस्थांच्या आणि अनेक दातृत्वान व्यक्तींच्या आर्थिक सहकार्यातून आणि प्रेरणेतून तसेच अनेक मान्यवरांनी शाळेची सुरू झालेली 100% ची परंपरा कायम ठेवावी असं आवाहन शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांना केले यावेळी पंचायत समिती उपसभापती विनायक दळवी दादा सावंत तांबोळी सरपंच अभिलाष देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक सावंत सर, माजी मुख्याध्यापक मसुरकर मॅडम, कोठावळे मॅडम, संघटना खजिनदार जयश्री दळवी, सस्था सचिव सुर्यकांत दळवी,आपा दळवी, राजाराम दळवी सह विलास दळवी, देवू दळवी, बाळकृष्ण बागवे, परेश धरणे, सुरेश सावंत, प्रमोद दळवी, महादेव सावंत सह कोनशी सरपंच सुभाष सावंत विलवडे सरपंच दिनेश दळवी, माजी मुख्याध्यापक मसुरकर मॅडम आदिंसह मोठया संख्येने माजी विद्यार्थी उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेवाळकर सर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + nineteen =