You are currently viewing हिवाळे धनगरवाडी येथील खचलेल्या रस्त्याची बाळा गोसावी यांच्याकडून पाहणी

हिवाळे धनगरवाडी येथील खचलेल्या रस्त्याची बाळा गोसावी यांच्याकडून पाहणी

मालवण :

मालवण तालुक्यातील हिवाळे धनगरवाडी हा सुमारे चार किलोमीटर रस्ता नुकत्याच सुरू झालेल्या पहिल्या पावसातच ठिकठिकाणी वाहून गेला असून आता हा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे नादुरुस्त बनला आहे. याबाबतचे वृत्त समजतात भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी मालवण तालुका अध्यक्ष बाळा गोसावी यांनी पाहणी केली. येथील स्थानिक ग्रामस्थांशी रस्त्याच्या समस्या बाबत चर्चा करून याबाबत सर्व संबंधित अधिकारी वर्गाचे लक्ष वेधून या रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात जास्तीत जास्त सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन येथील ग्रामस्थांना दिले.

हिवाळे धनगरवाडी येथील सुमारे चार किलोमीटर अंतराचा हा रस्ता गेली अनेक वर्षे नादुरुस्त अवस्थेत आहे. याबाबत येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी काही वेळा त्याची डागडुजी केली. तर काही मीटर रस्ता गतवर्षी डांबरीकरणही झाला. परंतु या वर्षी पावसाळ्यात उतारावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे हा रस्ता ठिकठिकाणी खचला असून वाहतुकीस अयोग्य बनला आहे. या परिसरात सुमारे सव्वाशे ते दीडशे लोक वस्ती असून जिल्हा परिषद ची एक प्राथमिक शाळा पण आहे. या रस्त्यानेच येथील शालेय मुले, कॉलेजला जाणारे विद्यार्थी, बाला वृद्ध ग्रामस्थ, महीला, नेहमी ये जा करत असतात. याचा या सर्वांना मोठा त्रास होत आहे. या रस्त्याच्या प्रश्नाबाबत बाळा गोसावी यांना समजतात त्यानी त्वरित या ठिकाणी जाऊन रस्त्याची पाहणी करून येथील ग्रामस्थांशी चर्चा विनिमय केला. तसेच त्वरित या प्रश्नासंदर्भात सर्व संबंधित अधिकारी वर्गाचे लक्ष वेधणार असून रस्त्याला जास्तीत जास्त निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच येथील ग्रामस्थांच्या विविध प्रश्नाबाबत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून, आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून आवाज उठविण्याचे आश्वासनही यावेळी बाळा गोसावी यांनी संबंधितांना दिले.

येथील स्थानिक ग्रामस्थांनी नुकतेच श्रमदानातून या रस्त्याची तात्पुरती डागडुजी केली आहे. रस्त्याचे कायमस्वरूपी डांबरीकरण करण्याची गेले कित्येक वर्षाची मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.

यावेळी येथील रामचंद्र जंगले,बाबुलाल शेळके, शैलेश मयेकर, रामचंद्र मसुरकर आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा