You are currently viewing सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि आमदारांना वेगळा न्याय

सर्वसामान्यांना वेगळा न्याय आणि आमदारांना वेगळा न्याय

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना कोरोना नियम धाब्यावर बसवून आमदारांच्या मुलांचा विवाह सोहळा पार पडल्याचं पाहायला मिळत आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला.

अत्यंत थाटामाटात पार पडलेल्या या शाही विवाह सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. महत्वाची बाब म्हणजे या विवाह सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग कुठेच पाहायला मिळालं नाही. आमदार राजेंद्र राऊत यांच्या रणजित आणि रणवीर या दोन मुलांच्या लग्नात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील, सुभाष देशमुख यांच्यासह अनेक नेते आणि मान्यवर उपस्थित होते. इतकंच नाही तर अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हते!

हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेल्या या सोहळ्या प्रकरणात बार्शी शहर पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. योगेश मारुती पवार या व्यक्तिविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. योगेश पवार यांनी या लग्न सोहळ्याला परवानगी मिळावी यासाठी बार्शी पोलिसात अर्ज केलेला होता. त्यामुळे सर्वसामान्यांच्या लग्नात वेगळा न्याय आणि आमदारांच्या मुलांच्या लग्नात वेगळा न्याय असे का असा सवाल आता या निमित्ताने उद्भवला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा