मालवण :
मालवणातील चिंदर ग्रामपंचायत येथे कृषी दिनाचे औचित्य साधून उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी त्यांच्या सोबत मालवण पंचायत समिती माजी सभापती धोंडू चिंदरकर, तलाठी योगेश माळी, ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर, शिक्षक रतन बुटे, निशिगंधा वझे, वासंती घाडी, रोहिणी केळसकर, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी विश्राम माळगांवकर, रणजीत दत्तदास, दिगंबर जाधव, राजु पालकर तसेच विद्यार्थी आदी उपस्थित होते.