दोडामार्ग
आर. आर.(आबा)पाटील “सुंदर गाव” पुरस्कार योजनेअंतर्गत दोडामार्ग तालुक्यातील ग्रामपंचायती मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केल्याने ग्रामंचायत कुडासे खुर्द (पाल पुनवर्सन) यांना जाहीर झाला असून आज या पुरस्काराचे वितरण दोडामार्ग गटविकास अधिकारी मनोजकुमार बेहरे व अन्य मान्यवर याच्या हस्ते प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार ग्रामपंचायत कुडासे खुर्द सदस्य संदेश देसाई ग्रामसेवक ज्योती डोगरदिवे व अन्य सदस्य ग्रामस्थ यांनी स्वीकारला.यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी दोडामार्ग गटविकास अधिकारी मनोजकुमार बेहरे तालुका आत्मा समिती अध्यक्ष प्रेमानंद देसाई सहाय्यक कृषी अधिकारी निलेश जाधव कोलझर सरपंच ऊर्मिला देसाई आदी उपस्थित होते यावेळी मान्यवर याच्या हस्ते कृषि क्षेत्रातील अनेक मान्यवर शेतकरी याचा गौरव करण्यात आला यावेळी प्रगतशील शेतकरी अनिल मोरजकर ,चंद्रशेखर सावंतआदींनी शेतकरी यांना मार्गदर्शन केले यावेळी गटविकास अधिकारी मनोजकुमार बेहरे यांनी शेतकरी यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून प्रगती साधावी यासाठी पंचायत समिती कृषि अधिकारी आपणास पूर्णपणे सहकार्य करणार आहे दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी यांनी केळी लागवड मोठया प्रमाणात करून नवीन लागवडीसाठी प्रस्ताव तयार करण्यात यावे असे आवाहन केले यावेळी प्रेमानंद देसाई एकनाथ नाडकर्णी आदींनी मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कृषि मंत्री कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती दोडामार्ग व तालुका कृषी कार्यालय व ग्रामपंचायत कोलझर याच्या संयुक्त विद्यमाने १जुलै रोजी कृषि दिन व कृषि मेळावा कोलझर येथे घेण्यात आला यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी दोडामार्ग तालुका आत्मा समिती अध्यक्ष प्रेमानंद देसाई गटविकास अधिकारी मनोजकुमार बेहरे माजी जिल्हा परिषद सदस्या संपदा देसाई तालुका कृषी अधिकारी प्रगतशील शेतकरी चंद्रशेखर सावंत सौ. उर्मिला देसाई सरपंच ग्रामपंचायत कोलझर कृषि अधिकारी जाधव प्रगतशील शेतकरी अनिल मोरजकर आदी मान्यवर उपस्थित होतेयावेळी ग्रामपंचायत कूडासे खुर्द सदस्य संदेश देसाई, सुरत कृष्णा शिरसाठ, गोविंद महादेव नाईक, सदस्या सानवी संदिप दळवी, मयुरी महेश पालव, संजना संजय सावंत, ग्रामसेवक ज्योती डोगरदिवे जेष्ठ ग्रामस्थ अर्जुन नारायण राणे महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष मनोहर सावंत राजाराम देसाई माणिकराव देसाई सी आर पी सुचित्रा हरिजन आदी ग्रामस्थ उपस्थित होते