भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख
भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय केला जातो. उत्तम शेती. कनिष्ठ नोकरी. अशी पूर्वीची महण आहे. म्हणजे शेती उत्तम आणि नोकरी कनिष्ठ ही समज त्यावेळी ठीक होती कारणं त्यावेळी वातावरण शुध्द करणारी मोठ मोठी टोलेजंग झाडं होती. हवेत प्रदुषण करणारी केमिकल व विविध औद्योगिक क्षेत्राच्या नावाखाली विविध कारखाने नव्हते. त्यामुळे लोकांचे आयुष्य सुखात समाधानात होतं. लोकांच्या अशा अपेक्षा कमी होत्या लोक सुविधा कमी होत्या पण मनापासून सुखी समाधानी होती. शेतीसाठी तयार करण्यात आलेले बी बियाणे घरीच तयार केले जात होते. दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक असल्याने जनावरं बकळ होती . जनावरांना विना केमिकल खाद्य चारा त्यामुळे शेतीला विना केमिकलच शेणखत मिळत होते. त्यामुळे पिकांचा व जमीनीचा कस कायम राहण्यास मदत होत होती.
आज काळ बदलला आणि सर्वत्र होणारी वृक्षतोड यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला. जागोजागी लोकांना काम नोकरी मिळावे असे फसव कारणं आणि मोठं मोठं पुढारी नेते आमदार खासदार मंत्री इंडस्ट्रीयल यांनी उभी केलेली एम आय डी सी. यातून आग ओकणारे धुरांडे यातून बाहेर पडणारे विषारी वायू. विविध केमिकल कंपन्या यांच्यातून निघणारे सांडपाणी नदीत खुलेआम सोडले जाते. यामुळे जल प्रदुषण सारखा मोठा प्रश्न आ वासून आपल्यापुढे उभा आहे. यामुळे आपले जीवनमान आणि निसर्गाचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की माणूस निसर्गापुढे गेला आहे. कारणं आज कृत्रिम पाऊस पाडण्याचा फसवा फंडा सुरू करुन लोकाची मन व मत जिंकण्याचा कार्यक्रम सुरू आहे .
आज शेती व्यवसाय शेतकरी लोकांच्या मुळावर आल आहे. कारणं आज सर्वत्र केमिकल मिश्रित पाणी. बोगस कीटकनाशके. बोगस तणनाशक. बोगस खत. बोगस बी बियाणे. फसवणूक शेती औजारे. फसवणूक कर्जमाफी. शेती कामगारांकडून फसवणूक
कागदपत्रे यांची अशी विविध ठिकाणी आज शेतकरी यांची फसवणूक व आर्थिक लुबाडणूक लुट केली जात आहे. यामुळे शेती आज मुळावर आली आहे.
शेतीसाठी महत्वाची असतें ती जमीन यामध्ये . जिरायती. बागायती . कोरडवाहू असे भाग शेतीचे पाडतात त्यामध्ये हंगामी. उन्हाळी पिके घेतली जातात पण आपल्या भागात शक्यतो शेत जमीन ही पाऊसावर अवलंबून असतें . नैर्ऋत्य मान्सून वार आपल्याकडे पाऊस घेऊन येते. आज हवामानात ग्लोबल वारमिंग झाल आहे त्यामुळे पाऊस घेऊन येणार वार सुध्दा आज दिशा बदलत आहे. हवामान अंदाज कधीच ठरला नाही. आणि ठरणारं नाही कारणं वारं आणि पाऊस यांचा कोणालाच अंदाज येत नाही आणि येणार नाही . जून चे आगोदर वळीव वाजून गडाडून पाऊस येतो त्यामुळे शेतीची मशागत करण्यासाठी पोषक वातावरण तयार होतें. आणि बघता बघता जून येतो आणि मान्सून आपल्याकडं मृग नक्षत्र नावाने सात जून पासून सुरू होईल अस आपणास सांगितले जाते. आपणं जुन्या अंदाजाप्रमाणे पेरणी करतो आणि पाऊस येतच नाही आणि आत्ता अशीच परिस्थिती उद्भवली आहे. आज लोकांनी महागडं बी बियाणे. खते. मशागतीचा पेरणीचा. शेतीसाठी कामगार खर्च. यासाठी उसणपासन करुन. सगेसोयरे यांचेकडून पैसा उदार घेऊन. व्याजाने काढून शेतीसाठी व शेतीकामासाठी पैसा उभा करतो आणि इकडे पाऊस दांडी मारतो काय अवस्था असेल त्या शेतकरी वर्गाची कोणी विचार केला कां? केविलवाणा चेहरा आणि पाणवलेले डोळे आकाशाकडे बघत असतात की आज मेघराज बरसल उद्या बरसल डोळ्यात असतें ती फक्त आणि फक्त पाऊस पडण्याची आस शेतकऱ्यांना कर्जमाफी फसवी योजना इथ फुसका बार ठरली आहे. कर्जापोटी शेतकरी आत्महत्या करतो आणि एकादा नेता म्हणतो साले कायम रडतच असतांत म्हणतो त्यावेळी त्या बळिराजा अन्नदाता याच्या जीवाला काय वाटतं असेल. एकादा बॅंक कर्मचारी म्हणतो की शेतकरी लोकांना कशासाठी कर्जमाफी द्यायची भरता येत नाही तर हे कर्ज काढतात कश्यासाठी आत्महत्या करुन बुडविणयासाठी ही मानसिकता आहे आपल्या लोकांची ज्यांनी शेतकरी या नावाचं भांडवल केलं आणि अनेक लोकं शेतकरी यांच्या जीवनावर शेतकरी नेते पुढारी आमदार खासदार मंत्री झाले आणि शेतकरी यांच्यासाठी बहाने करून शेतकरी व त्यांच्या मुलांना पुढ करून आंदोलन मोर्चा केले आणि आतल्या बाजूने बॅगा घेऊन आंदोलन मोर्चे आतल्या बाजूने मोडून काढले आणि आज कोट्यवधी रुपयांची माया यांनी शेतकरी नावाचं भांडवल करून मिळविली आणि शेतकरी आजही शेतात उपाशी फाटक्या कपड्याने चिखलात राबत आहे आणि शेतकरी नेते कमीत कमी कोटींच्या गाडीतून फीरत आहेत म्हणजे डोक्यावर पाय ठेवला ते डोक होत शेतकरी यांच आणि वर गेला तो नेता होता त्याने आपण वर गेलो म्हणजे शेतकरी यांच्या प्रश्नांसाठी हात दिलाच नाही म्हणजे शेतकरी जिथं होता तिथेच राहीला म्हणून आज डोळ पाणावले आहेत.
आपल्या देशात पुढारी नेते आमदार खासदार मंत्री शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना पेन्शन आहे मग शेतकरी यांना पेन्शन आहे पण ती विविध कारणांमुळे अडकून पडली आहे त्याचा कुणी मुद्दा घेतला आहे का? २३ जून रोजी २०२२ रोजी शासनाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान देण्याचा शासन निर्णय काढला आहे अंमलबजावणी कितपत होईल कोणाला माहिती . अवकाळी अवेळी पडलेला पाऊस वादळी वारे . यामध्ये शेतीचे नुकसान. घर पडणे. घरांचे छप्पर उडणे . पुराच्या पाण्यात जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान. मृत जनावरे. वाहून गेलेली जनावरे. वाहून व बुडून मृत्युमुखी पडलेली व्यक्ति . जनावरांच्या गोठ्याचे नुकसान. जीवनावश्यक वस्तू वाटपातील घोटाळा. बोगस नुकसान भरपाई पंचनामे. अशा विविध आपत्कालीन परिस्थितीत पंचनामा केला जातो आणि तो फक्त आणि फक्त कागदावरच आहे कारण २००५/ २०१४/ २०१९/ २०२० यावर्षी सांगली सातारा.कोलहापूर रत्नागिरी. सोलापूर . याभागत पुर परिस्थिती निर्माण झाली होती आणि ती बिकट होती पंचनामे झाले जिल्हाधिकारी यांचेकडे गेले मदत जाहीर झाली पण ती खरोखरच नुकसान झालेल्या लोकांना मिळालीच नाही मग ती गेली कुठं. पुराच्या वेळी आपल्या कर्तव्यात कसूर करणारे जीवनावश्यक वस्तू वाटपात घोटाळा करणारे यांच्यावर कारवाई करण्याचा जिल्हाधिकारी यांचा आदेश अंमलबजावणी झाली कां? किती अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली कोणाला माहित आहे कां?
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९