दोडामार्ग :
आडाळी एम आय डी सी मध्ये होवू घातलेला वनऔषधी संशोधन प्रकल्प हा महाआघाडी सरकारमधील मंत्री अमित देशमुख हे लातूरला नेण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मंत्री अमित देशमुख यांना “दिलखुलासपणा” दाखवण्याचा सल्ला दिला होता. याचीच नस पकडत आता भाजपानेही खासदार राऊत यांना आयुष मंत्री श्रीपाद नाईक आणलेला हा प्रकल्प आडाळीत होण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी शासन विरोधात रस्त्यावर उतरावे भाजप त्यांना जाहीर पाठिंबा देईल असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष प्रवीण गवस यांनी केले आहे.
आडाळी एमआयडीसीमध्ये हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प झाल्यास निश्चित या भागातील लोकांना त्यांचा फायदा होणार असून अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे. तसेच अनेकांचे लहान सहान व्यवसायही उभे राहणार आहेत. मात्र या प्रकल्पाबाबत महाआघाडीतील घटक असलेला काँग्रेस पक्ष राजकारण करत असून मंत्री अमित देशमुख यांनी केंद्र सरकारकडे हा प्रकल्प आपल्या लातूर या ठिकाणी व्हावा यासाठी पत्र दिले आहे दरम्यान या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन उपलब्ध असून या ठिकाणी हा प्रकल्प व्हावा यासाठी ठाकरे सरकारने ही जमीन उपलब्ध करून द्यावी, यासाठी प्रसंगी या भागातील लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरावे यात प्रामुख्याने इथले आमदार व खासदार यांनी रस्त्यावर उतरून हा प्रकल्प आडाळीत व्हावा यासाठी प्रयत्न करावे असे झाल्यास व हे लोक रस्त्यावर उतरले तर त्यांना भाजपातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात येईल असे दोडामार्ग भाजपातर्फे नवनिर्वाचित दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रवीण गवस यांनी केले आहे.