संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची ५५ प्रकरणे दाखल
शेकडो विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखल्यांचे तात्काळ वितरण
कुडाळ तहसील कार्यालय स्तरावरील विविध योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांना मिळावा या उद्देशाने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या सूचनेनुसार व कुडाळचे तहसीलदार अमोल पाठक यांच्या सहकार्याने बुधवारी शिवसेना आंब्रड विभागाच्या वतीने भरणी(घोटगे) येथे सकाळी १० ते दुपारी ३.०० या वेळेत कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.कुडाळ तहसीलदार अमोल पाठक व संजय गांधी निराधार योजना समितीचे कुडाळ अध्यक्ष अतुल बंगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कॅम्पचा शुभारंभ करण्यात आला. या कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कुडाळ तहसील कार्यालय मधील अधिकाऱ्यांच्या टीम मार्फत नागरिकांना विविध दाखल्यांसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र याबाबत माहिती देण्यात आली.संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची ५५ प्रकरणे दाखल करण्यात आली. तसेच शेकडो विद्यार्थी व पालकांना शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे उत्पन्न दाखले तात्काळ देण्यात आले. नागरिकांची प्रलंबीत कामे एका दिवसात मार्गी लागल्याने नागरिकांकडून शिवसेनेच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
यावेळी शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख महेश सावंत, आंब्रड विभागप्रमुख विकास राऊळ, युवासेना विभागप्रमुख निशांत तेरसे, भरणी सरपंच सौ.परब, कुंदे सरपंच सचिन कदम,पावशी सरपंच बाळा कोरगावकर, सोनवडे सरपंच उत्तम बांदेकर, पोखरण सरपंच समिक्षा जाधव, घोटगे सरपंच अमोल तेली, भडगाव उपसरपंच बाबी गुरव, कुंदे उपसरपंच सुशील परब,घोटगे उपसरपंच गीतेश सावंत, प्रवीण भोगटे,गुरू मेस्त्री, भावेश परब,सागर वाळके, तेजस भोगले, राजू परब, चंदन ढवळ, अवि नाईक, श्रीनिवास नाईक, पी डी सावंत, विजय परब, काशीराम घाडी, दीपक घाडी,अरुण सावंत, उदय मडव,सदा जाधव, दाजी ढवण, मनोहर नाईक, अवि नाईक, आदींसह शिवसैनिक सर्व सजांचे तलाठी, ग्रामसेवक व तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी,विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.