दुग्धविकास व पशु पालकांसाठी ‘श्वेत गंगा संवाद’ प्रमुख मार्गदर्शक कार्यक्रमाचे आयोजन..
ओरोस :
सिंधूदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचा ३९ वा वर्धापण दिन शुक्रवार दिनांक १ जुलै रोजी साजरा होत आहे.कृषी दिनाचा अन वर्धापन दिनाचा कार्यक्रम जिल्हा बँकेच्या प्रदान कार्यालया नजिकच्या माध्यमिक शिक्षक पतपेढी हॉलमध्ये स.११ वा. संपन्न होत आहे. जिल्ह्यातील दुग्धविकास व पशु पालकांसाठी ‘श्वेत गंगा संवाद’ प्रमुख मार्गदर्शक कार्यक्रम होत असून जिल्हा बँकेच्या या वर्धापननिमित्त कार्यक्रमात जिल्हावासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक केंद्रीय मंडळ संचालक सतीश मराठे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिंदेवाडी कागल येथील यशस्वी दूध उत्पादक योगेश खराडे झाराप येथील भगीरथ प्रतिष्ठानचे संचालक डॉ प्रसाद देवधर आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनाला गती देण्याचे धोरण जिल्हा बँकेने हाती घेतले आहे. जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक संस्था व जिल्ह्यातील पशुपालकांना प्रोत्साहन मिळावे त्यांना मार्गदर्शन मिळावे श्वेता गंगा संवाद या मार्गदर्शक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाही लाभ जिल्ह्यातील पशुपालक शेतकर्यांनी घ्यावा असे आव्हाने जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे