सिंधुदुर्गनगरी
जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग येथए जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जागतिक अंमली पदार्थ विरोधी व अवैध वाहतुक विरोधी दिन तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, आरएमओ डॉ. जाधव, मेट्रन श्रीमती वसावे, नर्सिंग महाविद्यालय प्राचार्य शिल्पा म्हाकले, एनसीडीचे केतन कदम, सल्लागार संतोष खानविलकर, सामाजिक कार्यकर्ते कामिस अल्मेडा, सिस्टर सोनम राणे, तृप्ती जाधव, मयुरी सावंत यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन क्लिनीकल सायकॉलॉजिस्ट रेश्मा भाईप यांनी केले. तसेच अंमली पदार्थांचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि जनजागृती कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन सायकॉलॉजिस्ट किरण कनकुटे यांनी केले.