You are currently viewing यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलला केंद्र शासनाचा ‘स्वच्छ विद्यालय 2021-22’ पुरस्कार

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलला केंद्र शासनाचा ‘स्वच्छ विद्यालय 2021-22’ पुरस्कार

जि.प.सीईओ प्रजित नायर यांच्या हस्ते पार पडले पुरस्कार वितरण

सावंतवाडी

केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातर्फे चराठे येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलला जिल्हास्तरावरचा ‘स्वच्छ विद्यालय 2021-22’ हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर (I.A.S.) यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मुख्यालयात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव देसाई व शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटेश बक्षी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

शिक्षण विभागातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार शाळेला एकूण स्वच्छता या विभागात 95% गुणांसह फाईव्ह स्टार रेटिंग प्राप्त झाले. तसेच कोव्हीड पूर्वतयारी व उपाययोजना व प्रसाधनगृहे स्वच्छता या उपविभागात ही फाईव्ह स्टार रेटिंग प्राप्त झाले.

p

या पुरस्काराबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले व संचालक मंडळ यांनी शाळेच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले व शासनाने शाळेच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा