You are currently viewing सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे मुलींसाठी प्रशिक्षण वर्ग

सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे मुलींसाठी प्रशिक्षण वर्ग

सावंतवाडी :

सावंतवाडी नगर परिषदेमार्फत सावंतवाडी शहरातील 18 ते 45 वयोगटातील मुली व महिलांना खालील प्रशिक्षण देण्यात येणार आहे. टॅली, एमएससीआयटी ६० दिवस, शिवण क्लास प्रशिक्षण ४०दिवस, केटरिंग प्रशिक्षण ३० दिवस असे विविध प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सावंतवाडी शहरातील मुली व महिलांनी ३० जून पर्यंत नगरपरिषदेत अर्ज भरून द्यावयाचा आहे.

सदर अर्ज नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातील लिपिक श्रीम. गीता जाधव यांजकडे उपलब्ध आहेत. टॅली प्रशिक्षण, शिवणक्लास प्रशिक्षण, केटरिंग प्रशिक्षण देणे कामी शहरातील तज्ञ अशा शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्था, नोंदणीकृत संस्था किंवा अहर्ताधारक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

सावंतवाडी शहरातील मुली व महिलांनी सदर प्रशिक्षणामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन नगर परिषदेचे प्रशासक प्रशांत पानवेकर व मुख्य अधिकारी जयंत जावडेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 2 =