उपाध्यक्षपदी स्नेहलता राणे, सचिवपदी उमा परब, खजिनदारपदी माधवी मुरकर…
कणकवली
रोटरी क्लब ऑफ कणकवलीच्या अध्यक्षपदी वर्षा बांदेकर यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी स्नेहलता राणे तर सचिवपदी उमा परब आणि खजिनदारपदी माधवी मुरकर असणार आहेत. नव्या कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा १ जुलै रोजी होणार आहे.
येथील हॉटेल साई पॅलेस मध्ये मावळते अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या उपस्थितीत आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी रोटरी क्लबचे असिस्टंट जनरल दीपक बेलवलकर, मीडिया प्रमुख दादा कुडतरकर, नितीन बांदेकर, डॅा.विरेंद्र नाचणे आदी उपस्थित होते.
रोटरी क्लब या सामाजिक संस्थेचा कार्यकाल हा दरवर्षी एक जुलै ते तीस जून असतो. या वर्षभराच्या कालावधीमध्ये मावळत्या कार्यकारिणीने राबवलेले उपक्रम आणि नव्याने निवड झालेल्या कार्यकारिणीच्या उपक्रमाबाबत आज माहिती देण्यात आली. तसेच नवीन कार्यकारिणीही जाहीर करण्यात आली. याविषयी बोलताना वर्षा बांदेकर म्हणाल्या, नव्या कार्यकारणी मध्ये बहुतांशी पदाधिकारी या महिलाच आहेत. भगवती मंगल कार्यालयात एक जुलैला सायंकाळी साडेसहा वाजता पदग्रहण सोहळा रोटरीचे डीजीई नासिर बोरसादवाला, नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तत्पुर्वी सायंकाळी चार ते सहा यावेळ कणकवली शहरातील महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुगा पासून बनवलेले पोस्टीक पदार्थ असा या स्पर्धेचा विषय आहे. महीलांनी हे पदार्थ तयार करून आणलेत. शहरातील महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पदग्रहण सोहळ्यामध्ये कणकवली नगरपंचायतीच्या एक स्वच्छता कर्मचारी आणि शासकीय रुग्णालयातील पोस्टमॉर्टम करणारे कर्मचारी यांचा सत्कार केला जाणार आहे. तसेच एक जुलै डॉक्टर दिनाचे औचित्य साधून रोटरीचे मेंबर असलेल्या सर्व डॉक्टरांचा सत्कारही केला जाणार आहे. मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी आयडियल ॲप वाटप करण्यात आले. जवळपास १३५० मूल दहावीतील मुलांना हे आयडियल ॲप देण्यात आले. मुलींसाठी सॅनिटायझरी नॅपकिन वाटप करून जनजागृतीचे उपक्रम घेण्यात आले. तालुक्यातील पंधरा ठिकाणी एक हजार वृक्षारोपण एनएसएसच्या माध्यमातून लावण्यात आल्याची माहिती डॉ.तायशेटे यांनी दिली.