कणकवली
संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन अंतर्गत कणकवली शाखेच्या वतीने सेक्टर संयोजक विलास जाधव यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी शिबीराला उत्तम प्रतिसाद मिळाला.निरंकारी भक्त व सेवादल बंधु भगिनींनसह रक्तदात्यांनी सहभाग घेतला पैकी ३७ जणांनी रक्तदान करत मानवतेच्या कार्यात बहुमोल योगदान दिले.
सदर शिबिराची सुरवात भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे “देवगड मुखी श्री.रमेश बंडबे” यांनी फीत कापून केली.गेल्या ३४ वर्षांपासून संत निरंकारी मंडळाच्या वतीने हा उपक्रम भारतवर्षामध्ये चालू असून नोव्हें. २०१९ पर्यंत १०,९०,९९० पिशव्या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून संकलित केल्या आहेत. वर्तमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार आवश्यक त्या सर्व सरकारी नियमांचे पालन केले गेले. हॅन्ड सॅनिटायझर , मास्क व हॅन्डग्लोसचा वापर करून सोशल डिस्टस्टिंगमध्ये रक्तदान शिबीर संपन्न झाले.
रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी रक्तकेंद्र व रक्त विघटन केंद्र जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग मधून डॉ.राजेश पालव, ब्लड बैंक टेक्निशीयन दिपाली माळगावकर,स्टाफ नर्स हेमांगी रणदिवे व ०४ जणांची टीम तसेच सेवादल संचालक, शिक्षक आणि सेवादल बंधू भगिनींनी बहुमोल सहकार्य केले.