पणजी
ओल्ड गोवा येथील एका प्राध्यापिकेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्षाच्या मुलाला गोव्यात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज करण्यात आली. गौरव प्रकाश बिद्रे (वय ३५, सध्या रा. ओल्डगोवा, मुळ रा. खासकीलवाडा-सावंतवाडी) असे त्याचे नाव आहे. तो संबंधित महिलेचा जीम ट्रेनर म्हणून काम करीत होता. गौरी आचारी (वय ३५) असे त्या खून झालेल्या महिलेचे नाव आहे.