You are currently viewing उत्कर्ष मंडळ मुंबई यांच्याकडुन विलवडे शाळा नं. 2 च्या विद्यार्थ्यांना शैत्रणिक साहित्यवाटप

उत्कर्ष मंडळ मुंबई यांच्याकडुन विलवडे शाळा नं. 2 च्या विद्यार्थ्यांना शैत्रणिक साहित्यवाटप

सावंतवाडी

उत्कर्ष मंडळ मुंबई (टेंबवाडी) यांच्यातर्फे जिल्हा परिषद शाळा विलवडे नं.२(टेंबवाडी) प्रशालेतील इ.१ते ४ सर्व विद्यार्थीना व अंगणवाडी विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य वा्टप केले.स्कूलबॅग,वह्या,कंपास :पेटी,पेन,चित्रकला वही इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच विलवडे तील मुंबईस्थित सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांचेतर्फे आपल्या आईच्या स्मरणार्थ शाळेला संगणक संच भेट दिला. तसेच जागतिक योगदिन शाळेत साजरा करण्यात आला.सर्व विद्यार्थ्यांना योगदिनाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली.

या कार्यक्रमाच्या विलवडे आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. मणेरीकर, माजी उपसभापती कृष्णा सावंत उपस्थित होते.तसेच या कार्यक्रमासाठी मंडळाचे रमण सावंत,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रश्मी सावंत,उपाध्यक्ष प्राजक्ता दळवी,प्रकाश दळवी,महेंद्र सावंत,सुभाष कानसे,संजय सावंत,सचिन सावंत,पूर्वा दळवी,धनश्री सावंत, माधुरी सावंत,समीता सावंत मानसी सावंत,जान्हवी सावंत ,वैष्णवी परब अंगणवाडी सेविका सीमा दळवी,मनाली दळवी, सर्व विद्यार्थी,अंगणवाडी विद्यार्थी,विविध समिती सदस्य,शाळेचे माजी विद्यार्थी, सर्व पालक व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुरेश काळे सर यांनी केले तर आभार सचिन शेळके यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा