You are currently viewing कोकण रेल्वेच्या डब्यात झुरळे आणि उंदीर!

कोकण रेल्वेच्या डब्यात झुरळे आणि उंदीर!

मसुरे :

मुंबई आणि कोकण जोडणाऱ्या व वाहतुकीचे सुलभ साधन असलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील बहुतांश रेल्वेमध्ये झुरळ उंदीर यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे. प्रवासादरम्यान अगदी वातानुकूलित बोगीमध्ये सुद्धा या प्राण्यांचा वावर दिसून येत आहे. प्रवाशांचे साहित्य तसेच कपडे कुरतडण्या पर्यंत या प्राण्यांची मजल गेली आहे. रेल्वे मंत्री व कोकण रेल्वेचे अधिकारी याबाबत कारवाई करतील का? कोकण रेल्वे प्रशासनाने याबाबत साफसफाई करणाऱ्या संबंधित एजन्सीना आदेश देण्याची तसेच कोकणकन्या, तुतारी या ट्रेनच्या डब्यांची तातडीने साफसफाई करण्याची मागणी आंगणेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते शशी आंगणे, सुनील आंगणे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा