बदलापूर
कप्प्यात खोल ह्रदयी दुखरी वही जळाली!
तेथून भावस्पर्शी जखमी गझल निघाली!
अशी काव्य रचना करणारे बदलापूर येथील सुप्रसिध्द गझलकार यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे यांच्या पहिल्याच गझल संग्रहाचा प्रकाशनाचा शानदार सोहळा दिनांक २० मे २०२२ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर प्रकाशन सोहळ्यास डाॅ.त्र्यंबक दुनबळे,दवणे सर,गोरे सर,प्रा.डाॅ.विसो शिंदे,बोढारे व महाराष्ट्राचे जेष्ठ गझलकार/संगितकार व गायक दत्ताजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.प्रा.धनंजय त्र्यंबक पगारे यांनी प्रास्तविक केले तर सुत्रसंचालन सौ.रुपाली साळवे यांनी केले.
यशवंत पगारे यांच्या सुनबाई शुभांगी व त्यांची नात अभिज्ञा(अशु)यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.
सर्व वक्त्यांनी पगारे यांच्या गझलांचे सविस्तर विवेचन केले. दत्ताजी जाधव यांनी काही गझला तरन्नुम मध्ये सादर केल्या.तर त्यांची शिष्या पुनम गाडे/जाधव यांनी गायन केले. पगारे यांच्या काहि गझला प्रेमाच्या असल्यातरी, सामाजिक भान जपणा-या आहेत. प्रत्येक गझल काहीतरी संदेश देऊन जाते. ह्या गझला माणसांची लाचारी,गद्दारी व स्वार्थीपणाचा पर्दाफाश करतात.खरंतर प्रत्येकाने तो संग्रह घेऊन वाचलाच पाहिजे.अतिशय सुंदर मुखपृष्ठ असलेला हा संग्रह महाराष्ट्रभर गाजेल असा आशावाद सर्व तज्ञांनी व्यक्त केला.
*ह्रदयातील सुगंधी जखमा* ह्या संग्रहास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. गझलकार यशवंत पगारे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९८९२३३३६८३ असा असुन कोणाला *हदयातील सुगंधी जखमा* गझल संग्रह घ्यायचा असल्यास संपर्क साधावा.असे आवाहनही यावेळी करण्यात आले. संग्रहाची किंमत २००/- रूपये आहे.
मात्र सवलत रु. १५० + पोस्टेज खर्च ५० असे एकूण रुपये २००/- मध्ये अंकाची बुकिंग सुरु आहे. मूल्य व पूर्ण पत्ता पाठवून अंक मिळू शकतात.
फोनपे क्रमांक 9892333683
UPI ID – 9892333683@ybl