You are currently viewing अर्जुन रावराणे विद्यालयात वृक्षारोपण संपन्न

अर्जुन रावराणे विद्यालयात वृक्षारोपण संपन्न

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे विद्यालयात आयोजन

वैभववाडी
कणकवली – वैभववाडी चे आमदार नितेश राणे यांचा आज वाढदिवस संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. वैभववाडी तालुक्यातील आपल्या मतदारसंघा बरोबरच तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अर्जुन रावराणे विद्यालयाकडे देखील आमदार नितेश राणे यांचे नेहमीच विशेष लक्ष असते. प्रशालेतील कोणताही कार्यक्रम असो किंवा उपक्रम नितेश राणे आवर्जून उपस्थित राहतात. मार्गदर्शन व सहकार्य या दोन्ही गोष्टी नेहमीच त्यांच्या माध्यमातून विद्यालयाला लाभत असतात आणि म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक तथा स्थानिक अध्यक्ष व जि.प. माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांच्या संकल्पनेतून प्रशालेत आज वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.वाभवे- वैभववाडी नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष व प्रभाग क्रमांक १ चे नगरसेवक रोहन रावराणे व नगरसेवक संजय सावंत यांच्या हस्ते प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी बोलताना नगरसेवक संजय सावंत यांनी आमदार नितेश राणे यांना दिर्घायुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर आमदार नितेश राणे यांचे प्रशालेस असलेले सहकार्य, मार्गदर्शन नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देते त्यांचे विद्यालया प्रती असणारे प्रेम असेच कायम राहु दे असे प्रशालेचे शिक्षक शिंदे सर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर सर,शिंदे सर तसेच प्रशालेचे इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 8 =