You are currently viewing दिंडी

दिंडी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ ज्योत्स्ना तानवडे यांची अप्रतिम काव्यरचना

चित्रकाव्य

दिंडी

दिंडी चालली पंढरी
पांडुरंगाच्या ओढीने
पायासंगे मन धावे
नाम घेई ते गोडीने ||

टाळ – मृदुंगाची जोड
खांद्यावरती पताका
वारकरी चालताना
नाम घोष मुखी ऐका ||

डोई घेतली तुळस
गळा तुळशीची माळ
भक्ति रसात रंगून
गाई अभंगाची ओळ ||

पंढरीची वारी असे
श्रद्धा भक्तीचा सोहळा
वाटेवरी जाता जाता
शिंपे भक्तीचाच मळा ||

ज्योत्स्ना तानवडे. पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 12 =