You are currently viewing आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक उपक्रम

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक उपक्रम

नगरसेवक रोहन रावराणे यांच्या संकल्पनेतून वैभववाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

वैभववाडी

कणकवली -देवगड चे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक रोहन रावराणे यांच्या संकल्पनेतून आज अर्जुन रावराणे विद्यालयात दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने यशस्वी विद्यार्थ्यांना नगरसेवक रोहन रावराणे यांच्या संकल्पनेतून स्पर्धा परीक्षेस मार्गदर्शक अशा पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्था अधीक्षक तथा स्थानिक अध्यक्ष जयेंद्र रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, मुख्याध्यापक नादकर बी एस, पाटील पी.एम., शिंदे एस बी, सावंत पी.जे., श्रीम.पाटील एस एस. सांस्कृतिक विभाग प्रमुख चोरगे एम एस, चव्हाण वाय जी., तुळसणकर एस टी, पवार पी. बी, मरळकर व्हि एस, पाटील पी.ए., प्रभू एन व्ही, चौगले आर बी तसेच युवक,युवती व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा