बांदा
जिल्हा परिषद बांदा न .1केंद्र शाळेत जागतिक आठवा योगदिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पतंजली योग समिती बांदा यांच्या वतीने या दिवशी शालेय विद्यार्थ्यांच्या कडून विविध प्रकारची योगासने,नाडी शोधन , प्राणायाम ,ध्यान इत्यादीचे विद्यार्थ्यांकडून सादरीकरण करून घेण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या योग वर्गाला बांदा येथील पतंजली योग वर्गातील शेखर बांदेकर, विकी केरकर,संजय नाईक,स्वानंद पवार स्नेहा धामापूरकर आदि योग साधकांनी या प्रात्यक्षिकाचे मार्गदर्शन केले.यावेळी शिवशंमू प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष जय भोसले उपाध्यक्ष तुषार देसाई उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून सांगितले व नियमितपणे योगसाधना करण्याचे आवाहन केले. यावेळी राकेश परब व प्रशांत गवस उपस्थित होते.
या दिवशी स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी दुपारच्या सत्रात चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध योगासने व योगासनांची जनजागृती यासंबंधी विविध प्रकारची चित्रे साकरली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी केले सूत्रसंचालन जे.डी.पाटील तर आभार सरोज नाईक यांनी मानले.योगदिन यशस्वी पार पाडण्यासाठी पदवीधर शिक्षिका उर्मिला मोर्ये ,रसिका मालवणकर,रंगनाथ परब, शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे,जागृती धुरी,शितल गवस यांनी परिश्रम घेतले.