ओरोस :
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग,आयुष विभाग आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शरद कृषी भवन येथे आज योग दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्गाटन जिल्हाधिकारी मा.के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते झाले यावेळी व्यासपीठावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा माहिती अधिकारी मा.प्रशांत सातपुते, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ संदेश कांबळे,जिल्हा क्रिडा अधिकारी मा.विद्या शिरस,जिल्हा आयुष अधिकारी ,डॉ. कृपा गावडे,डि.सी.ओ. निती काळे,एम. ओ सुशिल परब,डॉ राजेश पालव,डॉ .श्रीनिवास बेळनेकर व नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गचे कुडाळ तालुका समन्वयक विल्सन फर्नाडीस, सुदर्शन खांदारे, गौरव नागझरकर, भगवान हुमरमळेकर, श्रीरंग सामंत व सर्व तालुका स्वयंसेवक मृणाल परब,तेजल पारकर,ऐश्वर्य मांजरेकर, सोनाली धर्णे, प्रथमेश पेडणेकर , विश्वजित जाधव, अक्षय मोडक, सुजय जाधव, श्रद्धा चव्हाण उपस्थित होते.क्रीडा कार्यालय कर्मचारी व आयुष विभाग कर्मचारी आदि उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्गातील नामांकित योग प्रशिक्षक मा.साधना गुरव. यांनी प्रत्याशिकासह मार्गदर्शन केले .यावेळी कृषी कॉलेज,नर्सिंग ट्रेनींग कॉलेज जनरल हॉस्पिटल सिंधुदुर्ग कॉलेज,आय टी आय कॉलेज,ओरोस,न्यू इंग्लिश स्कुल ओरोस या योग शिबिरात एकूण २०३ युवक सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी उपस्थित योग प्रेमीना मार्गदर्शन करत योगाचे महत्व विषद केले. कोरोना आणि योग यांचे समन्वय त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रस्तापिक मा.मनीषा पाटील तालुका क्रीडा अधिकारी यांनी केले.सूत्रसंचालन सहदेव पाटकर आणि आभार प्रदर्शन तालुका स्वयंसेवक श्रीह्रर्षा टेगशे यांनी केले.