You are currently viewing पतीच्या निधनानंतर काही तासातच पत्नीचे निधन

पतीच्या निधनानंतर काही तासातच पत्नीचे निधन

सावंतवाडी शहरातील घटना : परिसरात हळहळ

सावंतवाडी

पतीच्या निधनानंतर अवघ्या काही तासात पत्नीनेही अखेरचा श्‍वास घेतल्याचा प्रकार आज येथील सालईवाडा भागात घडला. ही घटना आज अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.सुनिता बांदेकर (७०),असे तिचे नाव आहे.तर अशोक बांदेकर(८५), असे पतीचे नाव आहे.सावंतवाडीतील बांदेकर मेडिकल स्टोअरचे ते मालक होते.

याबाबत अधिक माहिती अशी की,पती अशोक बांदेकर यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.दरम्यान त्यांच्या पत्नी सुनिता बांदेकर यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने याबाबतची कल्पना देण्यात आली नव्हती.मात्र त्यांना उशिरा पतीच्या निधनाचे वृत्त सांगितल्यानंतर अंतिम दर्शन घेतानाच त्यांनी आपल्या पतीच्या पायावर माथा ठेवला.आणि तेथेच तिला हृदयविकाराचा झटका आला.यावेळी वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांनी तिची तपासणी केली.यावेळी ती मृत झाल्याचे त्यांनी घोषित केले.दरम्यान पती-पत्नीने एकाच दिवशी प्राण सोडल्याने उपस्थित सर्वच हेलावून गेले.त्यांच्या पश्चात दोन मुलगे व एक मुलगी व भाऊ असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + four =