स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन
ओरोस
सिंधुदुर्ग जिल्हयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत २५ जून २०२२ ते १ जुलै २०२२ या कालावधीत ” कृषि संजिवनी ” मोहिम आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. दिवेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत २५ जून २०२२ ते १ जुलै २०२२ या कालावधीत प्रत्येक कृषि सहाय्यकामार्फत दररोज एका गावात शेतकरी मेळावे “कृषि संजिवनी” मोहिमेत आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कृषि संजिवनी मोहिमेची सांगता १ जुलै २०२२ रोजी मा.स्व.वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषि दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणार आहे. खरीप पिकांच्या दृष्टीने या कालावधीत या मोहिमेव्दारे कृषि विभागाचे, कृषि विद्यापिठाचे शास्त्रज्ञ व कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ शेतक-यांच्या बांधापर्यंत जावून नविन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करताना शेतक-यांना नविन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शक करणार आहेत. सदर सप्ताहामध्ये कृषि विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गांवात तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसिद्धी करणार आहेत.
या कृषि संजिवनी ” सप्ताहात २५ जून २०२२ रोजी जिल्हयातील पिकांचे तंत्रज्ञान प्रचार व पिक फेरपालट बाबत मार्गदर्शक, भात क्षेत्रामध्ये विविध भात लागवड तंत्रज्ञान , बियाणे निवड, बिजप्रक्रिया कार्यक्रमांचे आयोजन, २६ जून २०२२ रोजी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व बाबत मार्गदर्शक, पौष्टिक तृणधान्य यांचे आहारातील महत्व, २७ जून २०२२ रोजी महीला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण अंतर्गत महीलांसाठी कौशल्य विकास बाबत मार्गदर्शक महिला शेतीशाळा, २८ जून २०२२ रोजी रासायनिक खत बचतबाबत मार्गदर्शक, खत बचत दिन जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, नॅनो युरिया वापर प्रसिद्धी, २९ जून २०२२ रोजी प्रगतशील शेतक-यांच्या शेतावर क्षेत्रिय भेटी व संवाद दिवस साजरा करणे, प्रगतशील शेतकरी संवाद रिसोर्स बँक मधील शेतकऱ्यांचा सहभाग, ३० जून २०२२ रोजी शेतीपूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस साजरा, शेतीपूरक व्यवसायांबद्दल प्रचार प्रसिद्धी, तर १ जूलै २०२२ रोजी कृषी संजीवनी सप्ताहाची सांगता व कृषि दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. दिवेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.