You are currently viewing कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर तिहेरी अपघात

कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर तिहेरी अपघात

वाहतूक पोलीस चंद्रकांत माने यांनी घटनास्थळी धाव

 

कणकवली :

कणकवली प्रांतकार्यालयासमोर एसटी बस, दुचाकी व कारचा समोरासमोर धडक होऊन तिहेरी अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. हा अपघात सायंकाळी ६.१५ वाजताच्या दरम्याने झाला आहे. कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या एसटीला रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर समोरून येणाऱ्या एसटीला धडक दिल्याने हा तिहेरी अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच नगरसेवक सुशांत नाईक, सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी, सोनू भंडारी, चेतन मुंज, नेरकर, मुना भंडारी, गणेश वराडकर, त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. या अपघातात चालक जखमी झाला आहे, हा अपघात अचानक कार सुरु होऊन विना चालक पुढे आल्याने झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस चंद्रकांत माने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा