इचलकरंजी
आजच्या स्पर्धेच्या काळात टिकून राहण्यासाठी व्यावसायिकांनी मार्केटींग व विक्रीचे कौशल्य आत्मसात करतानाच डिजिटल मार्केटींगचा वापर करणे आवश्यक असल्याचे मत चार्टर्ड अकौटंट भूषण चावरे यांनी इचलकरंजी येथे मराठा व्यवसाय संघाच्या मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलताना व्यक्त केले.
यावेळी चार्टर्ड अकौटंट भूषण चावरे यांनी सध्याच्या काळात कोणत्याही उद्योग व्यवसायासाठी डिजिटल मार्केटींगची गरज विविध उदाहरणांव्दारे स्पष्ट करुन सांगितली.तसेच उद्योग- व्यवसायात उतरताना आपल्या उत्पादित मालाचे बाजारपेठेत मार्केटींग व विक्रीचे कौशल्य आत्मसात करतानाच डिजिटल मार्केटींगचा वापर कशा पध्दतीने करायला हवा , यासंदर्भात अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची अगदी समर्पक उत्तरे देत त्यांच्यामध्ये नवे काही घडवण्याचा आत्मविश्वास जागवला.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यानंतर प्रमुख वक्ते चार्टर्ड अकौटंट भूषण चावरे यांनी उद्योग व्यवसाय क्षेत्रातील विविध संधी , मार्केटींगसाठी डिजिटल तंञज्ञानाचा कौशल्याने वापर यासंदर्भात अगदी सहज सोप्या भाषेत सविस्तर माहिती देवून यशस्वी होण्याचा मुलमंञ सांगितला.
या बैठकीस मराठा व्यवसाय संघाचे विनायक कामते , मच्छिंद्र पाटील, सचिन बाबर , विजयकुमार भोसले , विजयकुमार खराडे ,सागर रावण ,रवी चौगुले , चंद्रकांत पाटील , कुमार खोत ,सागर बागवडे, अवधूत बोंगार्डे ,वैभव कदम , स्वप्निल शिंदे ,अक्षय चव्हाण ,आदर्श चव्हाण , विनायक वाळके ,धनंजय शिंदे , नारायण शिंदे यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.