You are currently viewing मळेवाड-कोंडुरे गावाला “स्मार्ट” ग्रामपंचायतीचा बहुमान…

मळेवाड-कोंडुरे गावाला “स्मार्ट” ग्रामपंचायतीचा बहुमान…

सावंतवाडी

मळेवाड-कोंडूरे गावाला “स्मार्ट” ग्रामपंचायतीचा बहुमान मिळाला आहे. या गावाने स्मार्ट ग्रामपंचायतमध्ये तालुक्यात प्रथम येत आपल्या शिरेपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे ही तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने आगेकूच करणारी प्रगत ग्रामपंचायत आहे. तालुकास्तरीय स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कारासाठी तालुक्यातील सहभागी झालेल्या ग्रामपंचायती पैकी ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत दहा लाखाचे बक्षीस पटकावले आहे. या पुरस्कारा बरोबर ग्रामपंचायतिच्या व गावाच्या मुकुटात आणखीन एक मानाचा तुरा रोवला आहे.या पुरस्कारा बरोबरच ग्रामपंचायत आता जिल्हास्तरीय स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्काराच्या स्पर्धेसाठी सहभागी झाली असून अलीकडेच या पुरस्कारासाठी जिल्हास्तरीय समितीकडून गावाची पाहणी करण्यात आली आहे.ग्रामपंचायतला स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच मिलन पार्सेकर व उपसरपंच हेमंत मराठे यांनी गावातील सर्व ग्रामस्थांचे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतला सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा