You are currently viewing प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना

  • परिसंवाद व मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

उद्योग ,उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची अंमलबजावणी संपुर्ण देशात व राज्यात होत आहे. या योजनेव्दारे अवजारे व साधने यांचा वापर करुन तसेच हाताने काम करणाऱ्या पारंपारिक कारागीर आणि हस्तकलेच्या लोकांना ओळख प्राप्त करुन देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वागीण आधार देऊन त्यांचा विकास करण्यासाठी भारत सकारने ही योजना सुरु केलेली आहे.

गुरुवार दि. 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सिंधुदुर्गनगरी येथील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे परिसंवाद व जनजागृत्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यानी यांचा  लाभ घ्यावा, असे आवाहन प्र.जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

लाभार्थीची नोंदणी- नोंदणी करण्यासाठी आपल्या जवळील CSC सीएसी सेंन्टरमध्ये जाऊन  अर्ज करु शकता. नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे – आधारकार्ड, आधारलिंक मोबाईक क्रं, .स्वत:च्या कुटुबातील सर्वांचे आधार कार्ड, बॅक पासबुक, रेशनकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, ओळखपत्र पासपोर्ट साईज फोटो इ. कागदपत्रे आवश्यक आहे.

समाविष्ठ उद्योग-   या योजनेंतर्गत सुतार, सोनार, लोहार, चर्मकार, गवंडी, मुर्तीकार, परीट,  शिपी, कुंभार, हार-तुरे तयार  करणारे, नाभिक, विणकर, चटई झाडु बणविणारे,  दोऱ्या तयार करणारे, होड्या बांधणारे,                                                  मासेमारी जाळी बनविणारे, कुलुप तयार करणारे, पारंपारीक खेळणी बनविणारे  या उद्योगातील कारागीरसाठी उद्योग चालु असलेल्या व पारंपारीक काम करणारे कारागीर या योजनेत लाभ घेऊ शकतात.

ओळखपत्र – जे लाभार्थी या योजने निवडले जातील त्यांना ओळखपत्र दिले जाते. प्रशिक्षण- या योजनेत लाभार्थी निवड झाल्यानंतर पात्र लाभार्थीना 5 दिवसाचे मुलभुत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते त्यासाठी विद्यावेतन रुपये 500/- प्रति दिवस प्रमाणे विद्यावेतन दिले जाते. ( 5 ते 7 दिवस किमान 40 तास प्रशिक्षण ) तसेच ज्या योजनेनुसार निवड झालेल्या कारागीरांना विशेष प्रशिक्षण हवे असल्यास त्याची देखील सोय या योजनेत करण्यात आली आहे. प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्याची सुविधा या योजनेत आहे.

यंत्रसामुग्री अनुदान – रुपये 15000/- वस्तुस्वरुपात (टुल किट) लाभार्थीची निवड झाले नंतर त्यांचे प्रशिक्षण पुर्ण होताच त्यांना त्यांच्या उद्योगासाठी लागणारे हत्यारे /अवजारे खरेदी करण्य़ासाठी रुपये 15000/- टुल किट वस्तु अनुदानस्वरुपात दिली जाते.

अर्थसहाय्य-    प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांना उद्योगासाठी लागणारे अर्थसहाय्यासाठी पहिल्या टप्यात तारणमुक्त व्यवसायिकता विकास कर्ज एक लाख रुपयांचे कर्ज ( 18 महिन्याच्या मुदतीत परत फेडीसाठी ) देण्यांत येते.  पहिल्या टप्याची रक्कम लाभार्थीनी वेळेत परतफेड केल्यास त्यास व्यवसायाच्या विस्तारासाठी दोन लाखापर्यंत कर्ज दुसऱ्या टप्प्यात ( 30 महिन्याच्या मुदतीत परत फेडीसाठी ) उपलब्ध होणार आहे. सदर अर्थसहाय्य केवळ 5 टक्के व्याजदराने मिळणार आहे. उर्वरीत व्याजाची रक्कम शासन जबाबदारी घेणार आहे.

पात्रतेचे निकष :- असंघटीत क्षेत्रात स्वयंरोजगार तत्वावर हात – अवजारांनी काम करणारा व योजनेत नमुद केलेल्या 18 कुटुंब आधारीत पारंपारीक व्यवसायापैकी एका व्यवसायात असलेला कारागीर असणे आवश्यक आहे. वय वर्ष -18 पुर्ण असणे अवश्यक,.लाभार्थीने मागील 5 वर्षात राज्य सरकारच्या तत्सम पत आधारीत योजना ( उदा. पीएमईजीपी, सीएमईजीपी, मुद्रा योजना , पी,एम स्वनिधी अशा योजना ) लाभ घेतलेला नसावा. जर त्यांनी शासनाच्या केंद्र वा राज्य शासनाच्या योजनेत लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी

 

या योजनेत पात्र होत नाही. कुटुबांतील एका सदस्यापुरता लाभ मर्यादीत आहे. आई वडील व त्यांची अविवाहित मुले यातील एकास या योजनेचा लाभ घेता येतो.  सरकारी सेवेत असलेली व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय या योजनेत पात्र नाहीत. ज्या कुटुंबात शासकीय नोकरीस असल्यास त्याचा लाभ या योजनेत घेता येत नाही.नोंदणी  वेबसाईड:- या योजनेसाठी  pmvishwakarma.gov.in या वेब पोर्टल वरुन लाभार्थी अर्ज करु शकतात.

योजनेत उपरोक्त उद्योगात कार्यरत पात्र लाभार्थीनी आवश्यक त्या कागदपत्रासह कार्यक्रम स्थळी वेळेत उपस्थित राहुन  अर्जाची ऑनलाईन माहिती भरुन घेण्यात येणार आहे. तरी  जिल्ह्यातील लाभार्थीनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन धनंजय जोहारी, व्यवस्थापक, सुक्ष्म लघु एवं मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार, विकास कार्यालय, मुंबई यांच्यातर्फे  करण्यांत येत आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − seven =