You are currently viewing आरोंदा विकास सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व

आरोंदा विकास सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व

शिवसेना ९ जागा तर भाजपाने ३ जागांवर केला विजय प्राप्त

सावंतवाडी

गेल्या काही दिवसापासून सावंतवाडी तालुक्यातील विकास सोसायटींच्या निवडणुकात शिवसेना आणि भाजप मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असून या दोन्ही पक्षांत सत्तेसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. दरम्यान आरोंदा विकास सोसायटी निवडणुकीत शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित करत भाजपा पुरस्कृत पॅनलला जोरदार धक्का दिला आहे.

शिवसेना ९ जागा तर भाजपाने ३ जागांवर विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे शिवसेना गोटात आनंदाचे वातावरण आहे. आरोंदा विकास सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचे श्री. रघुनाथ गणेश नाईक (बबन), श्री. दिलीप मधुकर नाईक, श्री.ज्ञानदेव लक्ष्मण नाईक, श्री.गजानन लक्ष्मण कोरगावकर,श्री.अशोक राजाराम धर्णे,सदाशिव नारायण शेटकर,दिपाली विश्वनाथ नाईक भावना भदाजी नाईक,राजाराम कृष्णा जाधव हे नऊ उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना पुरस्कृत पॅनलचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आरोंदा शिवसेना विभाग प्रमुख आबा केरकर, शाखाप्रमुख प्रशांत नाईक,स्मिताली नाईक,आनंद नाईक,शिल्पा नाईक,मिलिंद कांबळी, बाळा आरोंदेकर ,गंगाधर होडवडेकर काका गावडे,सतीश रेडकर,अरूण पोळजी, विद्याधर नाईक,सुधीर गावडे,बाबू शेटकर, शंकर शांताराम नाईक,निवृत्ती नाईक, परशुराम नाईक, सुधाकर नाईक,सूर्यकांत नाईक ,सुरेश नाईक ,नाना गावडे,संदेश गावडे,बाबी गावडे तसेच असंख्य कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला होता.

सहकार निवडणूकीत भाजप आणि शिवसेना संघर्षमय वातावरणात झालेल्या शिवसेना पुरस्कृत पॅनलने बाजी मारली. भाजपच्या स्थानिक पदाधिकारी प्रतिष्ठेची केलेली निवडणुकीमध्ये रघुनाथ उर्फ बबन गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवताना भाजप पुरस्कृत पॅनलला जोरदार धक्का देत शिवसेनेचे नऊ उमेदवार निवडून आणले तर भाजप पुरस्कृत पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले भाजपच्या उमेदवारांचा २ व ४ मतांच्या फरकाने विजय झाला त्यामुळे तीन जागांवर शिवसेना पुरस्कृत पॅनलच्या उमेदवारांना पराभवाचा फटका बसला आहे. शिवसेना पुरस्कृत पॅनलच्या निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब, जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष डी बी वारंग, उपतालुकाप्रमुख राजू शेटकर, सुनील देसाई, कास सरपंच भाई भाईप आदींनी अभिनंदन केले. शिवसेना पुरस्कृत पॅनलच्या विजय झालेल्या उमेदवारांसह सर्वांनी आरोंदा बाजार पेठेतून वाजत गाजत मंदीरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा