You are currently viewing कणकवली रोटरी क्लब चा १ जुलैला पदग्रहण सोहळा

कणकवली रोटरी क्लब चा १ जुलैला पदग्रहण सोहळा

*सोहळ्याचे औचित्य साधून पाककला स्पर्धेचे आयोजन*

कणकवली :

 

कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात १ जुलैला रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे.

पदग्रहण सोहळ्यानिमित्त महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाककलेसाठी मुगापासुन पौष्टिक पदार्थ आकर्षक सजावटीसह तयार करून आणावयाचा आहे सोबत आपण तयार केलेल्या पदार्थांचे साहित्य व कृतीसह आपले नाव घालून एका पेपरवर लिहून आणावयाची आहे.

स्पर्धेसाठी अनुक्रमे एक ते तीन क्रमांक काढून पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना गॅस शेगडी , कुकर , ज्युसर इत्यादी आकर्षक बक्षिसे देण्यात येतील तसेच सहभागी सर्व महिलांना हि आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात येईल.

स्पर्धेसाठी रो. सौ. सुप्रिया नलावडे ९४२२०७०३४० / रो. सौ. शिवानी कसवणकर ९९७०३७३३७४ / रो. सौ. मेघा गांगण ९४०४४४८९९९ / रो. सौ. संध्या पोरे ७३८७३३०७२७ / रो. सौ. दिशा अंधारी ९४२२९९७६६७ यांच्याकडे नाव नोंदणी करावी. जास्तीत जास्त महिलांनी स्पर्धेसाठी आपली नावे नोंदवावीत असे आवाहन रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या परिवाराने केल आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा